‘एनआयओएस’ परीक्षांचे हॉल तिकीट उपलब्ध

पुणे – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (एनआयओएस) इयत्ता १० वी आणि १२वीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४च्या लेखी परीक्षांसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. फक्त अशा उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल, ज्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४च्या सार्वजनिक परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरले आहेत आणि त्यांचे छायाचित्र एनआयओएसकडे उपलब्ध आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, पण त्यांचे प्रवेशपत्र वेबसाइटवर उपलब्ध झालेले नाहीत, अशा उमेदवारांनी त्यांच्या प्रादेशिक केंद्रांशी त्वरित संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे. १० व १२वीच्या परीक्षा भारतीय आणि परदेशी परीक्षा केंद्रांसाठी २२ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत घेतल्या जातील. हे सर्व पेपर भारतीय विद्यार्थ्यांसाठी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी दुपारी ३ ते ६ या वेळेत घेतले जातील.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर, परीक्षा आणि निकाल, टॅबवर क्लिक करा आणि नंतर परीक्षा’ आणि नंतर ‘हॉल तिकीट ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४’ वर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल. नंतर विचारलेले क्रेडेन्शियल एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. त्याची एक प्रत प्रिंट घ्यावी लागणार आहे.





