तालेरा रुग्णालयाचे काम दीड वर्षानंतरही अर्धवट स्थितीत

नागरिकांची होणार सोय

तालेरा रुग्णालयाच्या पुर्नबांधणीमुळे चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी येथील नागरिकांना छोट्या-मोठ्या उपचारासाठी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही. त्यांना घरापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच कमी दरात चांगली वैद्यकिय सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच, चव्हाण रुग्णालय व महापालिकेच्या अन्य रुग्णालयांवरील ताण कमी होऊ शकेल.

पिंपरी –  महापालिकेच्या वतीने चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी तालेरा रुग्णालयाचे काम दीड वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. आत्तापर्यंत चार स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित वर्षभराच्या मुदतीत रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

प्रस्तावित रुग्णालयात 139 खाटांची सोय असणार आहे. रुग्णालयासाठी 1 मार्च 2018 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. प्रत्यक्ष कामाला मात्र 3 मे 2018 ला सुरवात झाली. तळमजला आणि पाच मजले अशी इमारत उभारण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत दिलेली आहे. 58 हजार 476 चौरस फूट क्षेत्रात हे बांधकाम होत आहे. आत्तापर्यंत केवळ 4 स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, 13 कोटी 27 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. कामाची सध्याची प्रगती पाहता दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल का, याविषयी साशंकता आहे.

वैद्यकीय व अन्य सुविधा :
बाह्यरुग्ण विभाग, 12 तपासणी कक्ष, क्ष किरण तपासणी व सिटी स्कॅन, 24 तास फार्मसी, आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्‍स, आपत्कालीन अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी, उर्वरित बाह्यरूग्ण विभाग, डे-केअर वॉर्ड (7 खाटा), अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्‍स – 4, डायलेसिस विभाग, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड (36 खाटा), सर्जिकल विभाग (36 खाटा), पॅथॉलॉजी लॅब, प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष, कान, नाक, घसा व नेत्र विभाग (16 खाटा), अस्थिरोग विभाग (20 खाटा), सभागृह (आसन व्यवस्था – 100) पार्किंग प्रस्तावित – 67 चारचाकी, 85 दुचाकी वाहने, प्रशस्त प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, सीसीटीव्ही सुरक्षा, अद्ययावत वातानुकूलित व्यवस्था, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन.

तालेरा रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या दीड वर्षात 42 टक्के इतके झाले आहे. रुग्णालय इमारत उभारणीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण केले जाईल.

– प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, महापालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here