Hair Care Tips: हेल्मेटमुळे केस गळतात का? जाणून घ्या खरे कारण आणि उपाय

Hair Care Tips: आजकाल केस गळणे ही समस्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला भेडसावते. खराब आहार, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जाते. पण अनेकदा लोक म्हणताना ऐकू येते की “हेल्मेट लावल्यामुळे केस गळतात!”खरंच हेल्मेट घातल्याने गंजेपण येतं का? यामागचं सत्य जाणून घेऊया.
हेल्मेट आणि केसगळतीचं नातं काय?
हेल्मेट डोक्याचे संरक्षण करते, अपघातात जीव वाचवते, पावसापासून केसांचे रक्षण करते. पण काहीजण मानतात की यामुळे केस गळतात. मात्र तज्ञांच्या मते, हेल्मेट हा केसगळतीचा थेट कारण नसून, त्याच्या चुकीच्या वापरामुळे समस्या वाढते.
केसगळतीची खरी कारणे
1. घाम आणि स्कॅल्पवरील घाण
सतत हेल्मेट घातल्याने टाळूला हवा मिळत नाही आणि त्यावर घाम साचतो. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन होऊन केसगळती वाढू शकते. हेल्मेट काही वेळाने काढून घाम पुसणे महत्त्वाचे आहे.
2. टाळूला हवा न मिळणे
घट्ट किंवा हवाबंद हेल्मेट वापरल्यास टाळूला ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात. म्हणूनच वेंटिलेशन असलेले हेल्मेट वापरणे चांगले.
3. स्वच्छतेचा अभाव
हेल्मेट नियमितपणे स्वच्छ न ठेवल्यास त्यात धूळ, डँड्रफ आणि बॅक्टेरिया साचतात. त्यामुळे टाळूला खाज, रॅश आणि केसगळतीची समस्या निर्माण होते.
4. निकृष्ट दर्जाची पॅडिंग
स्वस्त किंवा नकली हेल्मेटमध्ये वापरलेली फोम पॅडिंग त्वचेला अॅलर्जी देऊ शकते. त्यामुळे दर्जेदार आणि प्रमाणित हेल्मेटच वापरा.
केस निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
- स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरा.
- हेल्मेट घालण्याआधी कॉटन स्कार्फ किंवा सॉफ्ट कॅप वापरा.
- आठवड्यातून किमान एकदा हेल्मेट स्वच्छ धुवा.
- पुरेशी झोप, पोषक आहार आणि योग्य स्कॅल्प केअर पाळा.
- केसगळती जास्त वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
हेल्मेट हा केसगळतीचा शत्रू नाही. उलट, चुकीचा वापर आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष हीच खरी कारणे आहेत. योग्य काळजी घेतल्यास रोज हेल्मेट वापरूनही तुमचे केस निरोगी आणि दाट राहू शकतात.





