लष्कर-ए-तोयबाच्या प्रमुखाला भारताकडे करणार सुपूर्द? ; हाफिज सईदच्या मुलाचा व्हिडिओ समोर

Hafiz Talha Saeed Video। पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्याचा मुलगा तल्हा सईद आता उघडपणे माध्यमांसमोर आला आहे.तसेच त्याने दावा केला आहे की, हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली पूर्णपणे सुरक्षित आणि आरामात राहत आहे.
अलिकडच्या एका मुलाखतीत तल्हा सईद याने, “त्यांना पूर्ण विश्वास आहे की पाकिस्तान कधीही हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन करण्याचा विचारही करणार नाही.” असे म्हटले आहे. त्यांनी असेही सूचित केले की त्यांच्या वडिलांची तब्येत आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतः अधिक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे.
दहशतवादी हाफिज सईदबद्दलचा व्हिडिओ समोर Hafiz Talha Saeed Video।
दहशतवादी हाफिज सईदबाबत एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये त्याचा मुलगा तल्हा सईद एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हणत आहे की,”पाकिस्तान सरकार त्याच्या वडिलांना कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही. मुलाखतीदरम्यान, जेव्हा तल्हा यांना विचारण्यात आले की भारताच्या दीर्घकाळाच्या मागणीनुसार पाकिस्तान हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन करू शकतो का, तेव्हा त्यांनी सरळ उत्तर दिले आणि ते शक्य नसल्याचे सांगितले.
Hafiz Muhammad Saeed’s son, Hafiz Talha Saeed, is confident that Pakistan will never hand over Hafiz Muhammad Saeed to India.
That’s an open admission that Hafiz Muhammad Saeed is under the protection of the Government of Pakistan, and that the country serves as a safe haven for… pic.twitter.com/JS5SBOCZtf
— BALA (@erbmjha) June 5, 2025
तल्हा व्हिडिओमध्ये पुढे म्हणाले, “पाकिस्तान सरकार आणि गुप्तचर संस्थांना हे चांगलेच माहिती आहे की हाफिज सईदविरुद्ध भारताचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. भारताने बऱ्याच काळापासून आमच्याविरुद्ध खोटे आरोप रचले आहेत. सरकारला याचे सत्य माहित आहे आणि ते कधीही असा निर्णय घेणार नाहीत.”
गेल्या काही महिन्यांपासून तल्हा सईद खूप सक्रिय Hafiz Talha Saeed Video।
गेल्या काही महिन्यांपासून तल्हा सईद पाकिस्तानी माध्यमांमध्ये सतत सक्रिय असल्याचे दिसून येत आहे आणि धार्मिक आणि राजकीय व्यासपीठांवर त्याची उपस्थिती वाढली आहे. हाफिज सईदच्या बिघडत्या प्रकृतीनंतर संघटनेत नेतृत्व बदलाची शक्यता वाढली असल्याने, पुढील नेतृत्व म्हणून त्याची प्रतिमा स्थापित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.





