Pune | हडपसरचा गड चेतन तुपे यांनी राखला

पुणे,– हडपसर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांचा 5 हजार 100 मतांनी पराभव करीत चेतन तुपे यांनी हडपसरचा गड राखत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला आहे. तिरंगी झालेल्या या लढतीत जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते तर मनसेचे साईनाथ बाबर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत तुपे यांना 6 हजार 596 मते, जगताप यांना 5 हजार 341 मते आणि बाबर यांना 1 हजार 282 मते मिळाली. पहिल्या फेरीत तुपे यांनी 1 हजार 255 मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी तुपे यांनी शेवटपर्यंत टिकविली.
पंधराव्या फेरीत तुपे यांची आघाडी काहीशी कमी झाली होती. 18व्या फेरीत घाडी आणखी कमी होऊन 3 हजार 107 मतांवर घसरण झाली होती, परंतु 20व्याा फेरीत तुपे यांनी 2 हजार 767 मतांची आघाडी घेतली. तुपे यांना 1 लाख 21 हजार 625 मते, जगताप यांना 1 लाख 18हजार 858 आणि बाबर यांना 29 हजार 55 मते मिळाली.
निकालानंतर जगताप यांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.





