सासूच्या निधनाच्या बातमीनंतरही हसावे लागले; अर्चना पूरण सिंगने कॉमेडी शो दरम्यानचा सांगितला अनुभव

Archana Puran Singh | अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 पासून ती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जज म्हणून दिसली आहे. तिच्या हसण्याने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने एका मुलाखतीत कॉमेडी शोदरम्यानचा एक अनुभव शेअर केला आहे. शोदरम्यान तिला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. तिच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती गमावल्यानंतरही तिला शोमध्ये हसावे लागले.
एका मुलाखतीत अर्चना म्हणाल्या, “एका कॉमेडी शोदरम्यान, माझ्या सासूबाईंचे निधन झाल्याची बातमी मला मिळाली. तेव्हा आम्ही त्या कार्यक्रमाचा अर्धा भाग शूट केला होता आणि मी त्यांना सांगितले की, मला जावे लागेल, परंतु त्यांनी मला शोच शूटिंग पूर्ण होईपर्यंत बसण्याची विनंती केली. त्यानंतर मला काही काळ बसून हसायला लागले.”
“मी शोसाठी हसत होते आणि माझ्या मनात विचार येत होता की, माझ्या सासूबाई गेल्या आहेत आणि आता घरात काय चालले असेल. मला माहीत नाही याकाळात, मी कसे हसले. पण ३०–४० वर्षे या इंडस्ट्रीत काम केल्यावर, तुम्हाला समजते की निर्मात्यांनी यात पैशांची गुंतवणूक केलेली असते. तुम्ही तुमचे काम अपूर्ण सोडू शकत नाही,”असं अर्चना पुरण सिंग म्हणाल्या.
पुढे अर्चना म्हणाल्या, त्यावेळी त्यांनी फक्त ‘अॅक्शन’ म्हटलं आणि मी हसत राहिले. मी मनात विचार करत होते, इतकं वाईट कोणाचं नशीब असेल की अशा दुःखद बातमीनंतरही हसायला लागलं. पण शो चालू राहिला पाहिजे म्हणून मी हसले.”
अर्चनाला जेव्हा विचारण्यात आले की इतर कलाकारांना तिचा हेवा वाटतो. कारण ती फक्त मेकअप करते आणि कमाईसाठी हसते, तर इतर मेहनत करतात. त्यावर ती म्हणाली, “इतर कलाकारांना तिच्यापेक्षा दुप्पट पगार मिळतो. मला हसण्यासाठी यांच्यापेक्षा कमी पैसे मिळतात, तर त्यांना स्किटसाठी अधिक मेहनतीसाठी अधिक पैसे मिळतात.” रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अर्चना पूरण सिंगला कॉमेडी शोमध्ये एका एपिसोडचे 10 लाख रुपये फी मिळते.





