Guruji Talim Ganpati: गुरुजी तालीम गणपतीचे ५.०५ वाजता विसर्जन
Guruji Talim Ganpati:
Updated On:

Guruji Talim Ganpati: पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे दुपारी ५ वाजून ५ मिनिटांनी विधिवत विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात भाविकांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांची गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन सोहळा पार पडला.
टॅग्स:




