जळगावात ‘गुंडाराज’ सुरू; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

Jalgaon Crime News | जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. मेहरुण परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर अज्ञातांकडूनतीन राउंड फायर करण्यात आले आहेत.
या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. याशिवाय अहमद हुसेन यांचे समर्थकही घटनास्थळी हजर झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली.
दरम्यान, एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे घरातील सर्वजण साखर झोपेत असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या घरावर तीन राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काच फुटल्या आहे. Jalgaon Crime News |
काही दिवसापूर्वीच घडली होती अशी घटना
याप्रकरणी गोळीबार करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. जळगाव जिल्ह्यात याआधीही मुक्ताईनगर बोदवडमधून निवडणूक लढणारे उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावरही गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. या घटनेनं एकच मोठी खळबळ जळगाव जिल्ह्यात उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Jalgaon Crime News |
हेही वाचा:
“खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले” ; धनंजय मुंडेंच्या प्रचारसभेत पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य





