गुणवडीच्या जय ने चाखले लाखाचे लोणी; दहीहंडी फोडत पटकावला चषक

यवत (पुणे) – युवानेते तुषार दादा युथ फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यवत यांच्यावतीने यवत येथील धान्य बाजार मैदान येथे भव्य दहीहंडी उत्सव 2022चे आयोजन करण्यात आले होते. दहीदंडी फोडण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बारामती तालुक्यातील गुणवडी येथील जय दहीहंडी पथकाने पाच थर लावून दहीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे रेख बक्षीस व चषक पटकावले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, कुंडलीक खुटवड, सदानंद दोरगे, गणेश कदम, संजय शहा, दत्तात्रय दोरगे पाटील, दिलीप यादव, आबासाहेब दोरगे, सागर खुटवड, सागर दोरगे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रोहन दोरगे यांनी सुत्रसंचालन केले.


