Sandeep Deshpande | मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्यावरून मनसेकडून आज मोर्चाची हाक् देण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी मोर्चा काढू नये त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच काही मनसे पदाधिकाऱ्यांना देखील घरातून घेऊन विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधत ‘आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघणारच. सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल,’ अशी माहिती दिली. नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे? “महाराष्ट्रात नेमकं सरकार कोणाचं आहे, महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं आहे? महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी नाही, परंतु गुजराती लोकांना महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची परवानगी मिळते, ही भाजपची दडपशाही आहे. नरेस, परेस, सुदेस…यांना मोर्चा काढण्याची परवानगी द्यायची आणि मराठी लोकांना परवानगी द्यायची नाही, याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, मीरा-भाईंदरमधील गुजराती व्यापाऱ्यांना मोर्च्याची परवानगी दिली, मग आम्हाला का नाही?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. Sandeep Deshpande | …तरीही मराठी मोर्चा निघणारच “आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघणारच. सामान्य माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल, मराठी माणासांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही काही कुणालाही मराठी येत नाही म्हणून मारत नाही. आमचा हिंदीला कोणताही विरोध नाही. पण मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी माहिती देखील संदीप देशपांडे यांनी दिली. “महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचे भाजपकडून षडयंत्र रचले जात आहे. त्याला आम्ही बळी पडणार नाही. बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुबेसारख्या लोकांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी-अमाराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकारने कारवाई करावी,” असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले. Sandeep Deshpande | हेही वाचा: Shirur News : शिरुर तालुक्यात पुन्हा डाळिंबाची चोरी; दुचाकी जाग्यावरच सोडुन चोरांनी ठोकली धूम…