Gujarat Building Collapse : गुजरातेत इमारतीचा स्लॅब कोसळून 17 जण जखमी..
Updated On:

भावनगर :- गुजरातमधील भावनगर शहरात बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे तख्तेश्वर मंदिराजवळ इमारतीची बाल्कनी कोसळली. त्याच्या ढिगाऱ्यात एका बॅंकेसह 10 दुकाने जमीनदोस्त झाली. ढिगाऱ्याखाली दबून 17 जण जखमी झाले आहेत.
या इमारतीच्या खाली बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेसह 10 हून अधिक दुकाने आहेत. अपघाताच्या वेळी येथे सुमारे 20 लोक उपस्थित होते, त्यापैकी एक जण ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण दबले गेल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे. अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथकासह पोलिस अधिकारी आणि पालिकेचे तीन जेसीबी आणि अग्निशमन दलाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
बचाव पथकासोबत स्थानिक लोकही ढिगारा हटवण्यात गुंतले आहेत. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.





