WPL 2025 : गुजरात जायंट्सचा महत्वपूर्ण निर्णय, माजी क्रिकेटपटू प्रवीण तांबेवर सोपविली मोठी जबाबदारी…

Women’s Premier League 2025 (Gujarat Giants) : गुजरात जायंट्सने महिला प्रीमियर लीग 2025 च्या आधी गुरुवारी माजी लेगस्पिनर प्रवीण तांबे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली तर ऑस्ट्रेलियन डॅनियल मार्श फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला आहे. गेल्या मोसमात संघात सामील झालेला मायकेल क्लिंगर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहे.
तांबेने 2013 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला कोचिंगचा खूप अनुभव आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्ससोबत काम केले आहे.
Our guiding force is here… ✍️
The Giants’ coaching cavalry is ready to make every moment count. 🎯
📌 Michael Klinger – Head Coach
📌 Pravin Tambe – Bowling Coach
📌 Daniel Marsh – Batting Coach #BringItOn #TATAWPL #GujaratGiants #Adani #WPL2025 pic.twitter.com/svrDO1gpnL— Gujarat Giants (@Giant_Cricket) December 12, 2024
यापूर्वी या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक नुशीन अल खादीर होते, त्यांचा दोन वर्षांचा करार संपला आहे. इंडियन प्रीमियर लीग (2014) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्ससाठी हॅटट्रिक घेणारा खेळाडू अशी तांबेची ओळख आहे. त्याने या सामन्यात मनीष पांडे, युसूफ पठाण आणि रायन टेन डोईशेट यांना बाद केले आणि रॉयल्सने 10 धावांनी सामना जिंकला होता.
मार्शलाही खूप अनुभव आहे. त्यांनी 2013 ते 2017 पर्यंत तस्मानिया पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जायंट्स संघ मागील 2023 आणि 2024 या दोन्ही हंगामात पाच संघांमध्ये शेवटच्या स्थानी राहिला होता. 2025 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 15 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.





