Gujarat Election 2022 : आज होणार गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर
Updated On:

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता दिल्लीतील आकाशवाणी भवनच्या रंगभवन सभागृहात पत्रकार परिषदेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करणार आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2017 प्रमाणे गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार का, असा प्रश्न राजकीय पक्षांतर्गत चर्चिला जात आहे.
दरम्यान, दोन टप्प्यात निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत आणि बहुमताचा जादुई आकडा 92 आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. विरोधी पक्ष काँग्रेसला 77 तर इतरांना सहा जागा मिळाल्या.





