गुजरातमधील ‘आप’च्या विजयावर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,’अरविंद केजरीवाल…’

Gujarat Bypoll Result । गुजरातच्या विसावदर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी विजय मिळवला. दुसरीकडे, पंजाबच्या लुधियाना पश्चिम जागेवर आपचे संजीव अरोरा विजय मिळवण्यात यशस्वी झाले. दोन्ही राज्यातील दोन जागांवर विजय मिळवल्यानंतर, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय सिंह यांनीही सोशल मीडियाद्वारे गोपाल इटालिया आणि संजीव अरोरा यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपला टोला देखील लगावला आहे.
गुजरातमध्ये आपचा विजय आश्चर्यकारक Gujarat Bypoll Result ।
संजय सिंह यांनी पोस्टमध्ये, “भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये आपचा आश्चर्यकारक विजय. गोपाल इटालिया यांनी विसावदर जागेवरून १७५५४ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. अरविंद केजरीवाल, टीम गुजरात, गुजरातच्या जनतेचे आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे खूप खूप अभिनंदन.” असे म्हटले आहे.
लुधियाना पश्चिम जागेवरील विजयाबद्दल संजय सिंह यांनी काय म्हटले? Gujarat Bypoll Result ।
दुसऱ्या पोस्टमध्ये, संजय सिंह यांनी लुधियाना पश्चिम जागेवरील विजयाबद्दल लिहिताना, “लुधियाना पश्चिम येथील आपचे उमेदवार संजीव अरोरा १०,६३७ मतांनी विजयी झाले. अरविंद केजरीवाल, भगवंत मान, टीम पंजाब आणि लुधियाना पश्चिमच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन.” असे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ‘आप’चे गुजरात युनिटचे माजी अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघात त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांचा १७,५५४ मतांनी पराभव केला. राज्यात जवळजवळ पूर्ण वर्चस्व असूनही, भाजपने २००७ पासून विसावदर मतदारसंघ जिंकलेला नाही.
BJP के गढ़ गुजरात में “AAP” की ग़ज़ब की जीत।@Gopal_Italia ने विसावदर सीट से 17581 मतों के भारी अंतर से जीत दर्ज की।@ArvindKejriwal जी “टीम गुजरात” गुजरात की जनता और पार्टी के एक-एक कार्यकर्ता को बहुत बहुत बधाई। https://t.co/xXsRcay8bf
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 23, 2025
डिसेंबर २०२३ मध्ये तत्कालीन ‘आप’चे आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली. त्याच वेळी, पंजाबमधील सत्ताधारी ‘आप’ने लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यांचे उमेदवार संजीव अरोरा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशू यांचा १०,६३७ मतांनी पराभव केला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, अरोरा यांना ३५,१७९ मते मिळाली तर आशू यांना २४,५४२ मते मिळाली. भाजपचे जीवन गुप्ता यांना २०,३२३ मते मिळाली, तर शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) परोपकार सिंग घुम्न यांना फक्त ८,२०३ मते मिळाली. जानेवारीमध्ये आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक आवश्यक झाली.





