Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 788 उमेदवार रिंगणात; भाजप आणि कॉंग्रेसने….

अहमदाबा :- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत.
त्यातील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान होईल. त्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत समाप्त झाली. त्यामुळे रिंगणात उरलेल्या उमेदवारांची नेमकी आकडेवारी स्पष्ट झाली.
पहिल्या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व जागांवर भाजप आणि कॉंग्रेसने उमेदवार दिले आहेत. तर, आप 88 जागा लढवत आहे. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांचे भवितव्य ठरेल. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होईल. त्या टप्प्यात रिंगणात उरणाऱ्या उमेदवारांची नेमकी संख्या 21 नोव्हेंबर या दिवशी समजेल.
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 90 ते 95 जागा यावेळी आम्ही जिंकणार असल्याचा दावा आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.





