Mirzapur 3 । कालिन भैय्यापासून ते गुड्डू भैया आणि गोलू गुप्तापर्यंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ३ दिवसात म्हणजे ५ जुलैला ‘मिर्झापूर ३’ OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ही वेब सिरीज रिलीज होणार आहे. सर्व स्टार्स सध्या या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजलचा एक प्रमोशनल व्हिडिओ समोर आला आहे. त्याने एक व्हॉट्सॲप नंबर जारी केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गुड्डू भैयासोबत गोलू गुप्ता (श्वेता त्रिपाठी) देखील दिसत आहे. दोघेही राईट हॅन्ड शोधत आहेत. अली फझल म्हणतो, “मिर्झापूरमध्ये सत्ता टिकवण्यासाठी आम्हाला निष्ठावंत राईट हॅन्डची गरज आहे.” श्वेता पुढे म्हणाली, “तुम्ही आमच्यात सहभागी व्हाल का? आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर देत आहोत, आम्हाला मेसेज करा आणि बोलूया.” हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना प्राइम व्हिडिओने लिहिले की, “गुड्डू आणि गोलूच्या राईट हॅन्डची जागा रिक्त आहे. ९३२४९६५७९१ वर ‘हाय’ व्हाट्सॲप करा आणि तुमच्याकडे काय आहे ते जाणून घ्या. आता या व्हिडिओवर कमेंट्सचा महापूर आला आहे. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, “एकदा राईट हॅन्ड करा, गुड्डू भैया. तुला अभिमान वाटेल.” एका युजरने लिहिले, “भाऊ, कृपया आम्हाला एक संधी द्या. मिर्झापूरची सत्ता आणि गादी तुमचीच असेल. अशात मजेदार कंमेंस्ट्स आता या पोस्ट येत आहे. कमेंट करणाऱ्यांमध्ये मुन्ना भैय्याच्या चाहत्यांचाही समावेश आहे. त्याच्या एका चाहत्याने लिहिले, “माफ करा, मी मुन्ना भैय्याशी एकनिष्ठ आहे.” दरम्यान या मालिकेसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, यावेळी मुन्ना भैया या मालिकेत दिसणार नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे.