GT vs RR : साई सुदर्शनच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर उभारला धावांचा डोंगर

GT vs RR Gujarat Titans set Rajasthan Royals a target of 218 runs : आयपीएल २०२५ मधील २३ व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातने साई सुदर्शनच्या वादळी ८२ धावांच्या जोरावर ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. राजस्थान रॉयल्ससाठी तीक्षना आणि देशपांडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हे साई सुदर्शनचे सलग पाचवे अर्धशतक आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानला चांगली सुरुवातही मिळाली कारण शुबमन गिलला जोफ्रा आर्चरने फक्त २ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यात ८० धावांची भागीदारी केली. बटलरने २६ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. बटलर बाद झाल्यानंतर, शाहरुख खानने जबाबदारी घेतली आणि २० चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी केली आणि साई सुदर्शनसोबत ६२ धावांची भागीदारी केली.
Innings Break!
Solid contributions from #GT batters power them to 217/6. 🎯#RR's chase on the other side ⏳
Scorecard ▶ https://t.co/raxxjzY9g7#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/MzhSnPVhJe
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
सुदर्शनने अहमदाबादमध्ये झळकावले सलग पाचवे अर्धशतक –
साई सुदर्शन आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. अहमदाबादमधील याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांच्या सलग दोन डाव खेळले होते. त्यानंतर, या वर्षीही त्याने त्याच मैदानावर सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचे डाव खेळल्याृ आहेत. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने हे केले नाही. २०१८ ते २०१९ या काळात आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनेही असाच पराक्रम केला होता. आता कोणीतरी त्याची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – PBKS vs CSK : पंजाबच्या विजयानंतर चहल-महावशच्या फोटोने खळबळ! नेमकं कारण काय?
शेवटच्या ८ षटकांत कुटल्या १०७ धावा –
एकेकाळी गुजरातने १२ षटकांत ११० धावा केल्या होत्या आणि तिथून २०० धावसंख्येपर्यंत पोहोचणे खूप कठीण वाटत होते. १२ व्या षटकापर्यंत साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर, सुदर्शनने १७ चेंडूत २८ धावा काढल्या आणि बाद झाला, पण गुजरातला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात शाहरुख खानने मोठी भूमिका बजावली. त्याने २० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावा केल्या.
हेही वाचा – KKR vs LSG : ‘…तर मोठा वाद होईल’, केकेआरच्या पराभवानंतर पिच क्युरेटरवर संतापला अजिंक्य रहाणे
गुजरातसाठी सहसा फिनिशरची भूमिका बजावणारा राहुल तेवतियाही शेवटच्या षटकांमध्ये चमकला. तेवतियाने फक्त १२ चेंडूत २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ षटकार आणि २ चौकारही मारले. राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षनाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.





