GT vs MI : गुजरात टायटन्सने IPL 2025 मध्ये उघडले विजयाचे खाते, मुंबई इंडियन्सने गमावला सलग दुसरा सामना

GT vs MI Gujarat Titans beat Mumbai Indians by 36 runs : आयपीएल २०२५ चा ९वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने हा सामना साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ३६ धावांनी विजय मिळवला. यासह गुजरातने यंदाच्या हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने सलग दुसरा सामना गमावला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ८ बाद १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ६ गडी गमावून फक्त १६० धावाच करु शकला.
मुंबईचा सलग दुसरा पराभव –
लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांच्या विकेट्स खूप लवकर गमावल्या. नंतर, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी ६२ धावांची भागीदारी करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव डळमळीत झाला. मुंबईचा हा दुसरा पराभव आहे आणि त्यांना आयपीएल २०२५ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही.
मुंबईच्या फलंदाजांनी केली निराशा –
Thrilling the home crowd with a performance to cherish 🤩
Gujarat Titans get their #TATAIPL 2025 campaign off the mark 💪
Scorecard ▶ https://t.co/lDF4SwnuVR #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/iy60R0cOwZ
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४८ धावा केल्या, तर तिलक वर्माने ३९ धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त, इतर कोणीही प्रभावित करू शकले नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने ११, रोहित शर्माने आठ, रिकलटनने सहा आणि रॉबिन मिंजने तीन धावा केल्या. याशिवाय, नमन धीर आणि मिशेल सँटनर १८-१८ धावा करून नाबाद परतले. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडा आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – GT vs MI : सलग ३ चेंडूंवर पडल्या ३ विकेट्स, पण पूर्ण झाली नाही हॅटट्रिक, काय होतं कारण? जाणून घ्या
गुजरातसाठी साई सुदर्शनने झळकावले अर्धशतक –
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातसाठी शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या मदतीने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. २७ चेंडूत ३८ धावा काढल्यानंतर गिल बाद झाला आणि अर्धशतक हुकले. गिल बाद झाल्यानंतर, जोस बटलरने सुदर्शनसह ५१ धावांची भागीदारी केली, परंतु तो ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, सुदर्शनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले आणि ६३ धावा करून बाद झाला. सुदर्शन बाद होताच गुजरातचा धावगती मंदावली आणि संघ २०० धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. गुजरातकडून शेरफेन रदरफोर्डने १८ धावा, शाहरुख खानने ९ धावा, रशीद खानने ६ आणि आर साई किशोरने १ धावा केल्या, तर कागिसो रबाडा सात धावा काढून नाबाद राहिला.





