GST दर कपातीचा परिणाम: 30 वस्तू स्वस्त; लोणी, तूप, चॉकलेटचे दर कमी करण्यासाठी सरकारचा उत्पादकांवर दबाव

नवी दिल्ली – 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक 54 वस्तूंच्या दरांकडे सरकारचे लक्ष आहे. 54 पैकी 30 वस्तूच्या दरात अपेक्षेपेक्षा जास्त कपात झाली आहे,असे सरकारचे म्हणणे आहे. उरलेल्या वस्तूचे दर कमी व्हावेत यासाठी सरकार उत्पादकांशी चर्चा करीत असल्याचे सांगण्यात आले.
सरकारने सांगितले की, 54 वस्तूंच्या दरात सर्वसाधारणपणे कपात झाली आहे. मात्र 24 वस्तूचे दर अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात घटले आहेत. केंद्र सरकारने. ज्या वस्तूच्या दराकडे जीएसटी अधिकार्यांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यामध्ये लोणी, चीज, तूप, दुधाची पावडर, साबण इत्यादीचा समावेश आहे.
जीएसटीच्या 21 विभागांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 30 वस्तूंचे दर अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाल्या आहेत. त्यामध्ये एसी मशीन, टीव्ही सेट, टोमॅटो केचप, चीज, सिमेंट इत्यादीचा समावेश आहे. ड्रायफ्रूट, सोया मिल्क, पेयजल इत्यादीच्या दरात बरीच घट झाली आहे.
या वस्तूवरील कर सर्वसाधारणपणे 22 टक्क्यांवरून पाच टक्के इतका करण्यात आला आहे.
24 वस्तूंचे दर अपेक्षेइतके कमी झालेले नाहीत. त्यामध्ये वह्या, चॉकलेट, केसाचे तेल, टूथपेस्ट, पेन्सिल, थर्मामीटर, सायकल इत्यादीचा समावेश आहे. लोण्याचा किमती कमी झाल्या नाहीत. सरकारने सांगितले की, लोण्यावरील कर 12 ते 18 टक्क्यांवरून केवळ पाच टक्के इतका करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात लोण्याच्या किमती केवळ सहा ते अकरा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामध्ये आणखी कपात करण्यास वाव आहे. त्यासाठी केंद्र सरकार पाठपुरावा करीत आहे.
लोण्याबरोबरच तूप, चॉकलेट, बिस्कीट, लाह्या, आईस्क्रीम आणि केकचे दरही ज्या प्रमाणात कर कपात झाली आहे, त्या प्रमाणात कमी झालेले नाहीत. स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. शुक्रवारी त्यांनी या संदर्भात जीएसटी विभागाच्या अधिकार्यांबरोबर चर्चा केली. ज्या वस्तूच्या दरात कपात झालेली नाही, त्या वस्तू उत्पादकाशी चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





