GST : जीएसटी संकलनात वेगाने वाढ; 5 वर्षात संकलन दुपटीने वाढले

नवी दिल्ली : अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटीची यंत्रणा चांगली रुळली आहे. त्यामुळे जीएसटी संकलन वेगाने वाढत आहे. गेल्या पाच वर्षात जीएसटी संकलनात दुपटीने वाढ झाली असल्याची आकडेवारी केंद्र सरकारने जारी केले आहे. प्राप्त माहितीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षात 11.37 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. 2024-25 मध्ये हे कर संकलन वाढून 22.08 लाख कोटी रुपये झाले आहे.
2023-24 मध्ये झालेल्या जीएसटी संकलनामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल 9.4 टक्क्यांची वाढ नोंदली आहे. आगामी काळात कर संकलन वाढेल याबाबत अप्रत्यक्ष कर विभाग आशावादी आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये, 2024 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये दर महिन्याला साधारणपणे 1.84 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले. याचा अर्थ वर्षागणिक या संकलनात वाढ होत आहे. करदात्यांंचा त्रास कमी व्हावा यासाठी सर्व प्रत्यक्ष कराचे एकत्रीकरण करून एक जुलै 2017 रोजी जीएसटी कर यंत्रणा अंमलात आली होती.
करदात्यांची वाढली संख्या
2017 मध्ये केवळ 65 लाख जीएसटी करदाते होते. आता ही संख्या वाढून 1.51 लाख इतकी झाली आहे. यावरून या कालावधीत करदात्यांची संख्या किती प्रमाणात वाढली आहे हे दिसून येते. कर विभागाने कर संकलन करणे सोपे केले आहे. त्याचबरोबर या यंत्रणेबाबत करदात्याना माहिती उपलब्ध केली आहे. त्यामुळे हे कर संकलन आणि करदात्यांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.





