पुणे – सध्या करोनाचा मुकाबला करण्यासाठी व्हेंटिलेटर्स, मास्क, टेस्ट किटस्, सॅनिटायझर आदींचा वापर होत आहे. त्यामुळे या उपकरणांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत यावरील जीएसटी कमी करावा, अशी सूचना काही वर्गाकडून होत आहे. मात्र, यावरील जीएसटी कमी केला जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जर यावरील जीएसटी कमी केला तर या उत्पादकांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. त्यामुळे या उत्पादनांचे दर कमी होण्याऐवजी वाढतील. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही बाब ज्यांच्या लक्षात आलेली नाही अशांकडून जीएसटी कमी करण्याची मागणी करण्यात आली असल्याचे दिसून येते.
सध्या व्हेंटिलेटरवर 12 टक्के, मास्कवर 5 टक्के, टेस्टिंग किटवर 12 टक्के, सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.