Car Prices Down: जीएसटी कपातीमुळे कोणत्या कंपनीच्या कारच्या किमतीत किती घट? सर्व ब्रॅंडबाबत जाणून घ्या…

GST 2.0: भारत सरकारने अलीकडेच लागू केलेल्या जीएसटी २.० सुधारणांमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात किंमत कपात झाली आहे. नव्या कर रचनेनुसार, लहान कार्सवर (१,२०० सीसीपर्यंत पेट्रोल/एलपीजी/सीएनजी आणि १,५०० सीसीपर्यंत डिझेल, ४ मीटरपेक्षा लहान) जीएसटी २८% वरून १८% झाला आहे, तर मोठ्या आणि लक्झरी वाहनांवर ४०% निश्चित दर लागू झाला आहे. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती कमी करून ग्राहकांना थेट लाभ देण्याची घोषणा केली आहे. नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असले, तरी काही कंपन्यांनी लगेचच किमती कमी केल्या आहेत.
ब्रँडनिहाय किंमत कपात:
ब्रँड – किंमत कपात (रुपयांमध्ये)
ऑडी – २.६ लाख ते ७.८ लाख
टाटा मोटर्स – ७५,००० ते १.४५ लाख
महिंद्रा – १.५६ लाख पर्यंत
टोयोटा – ३.४९ लाख पर्यंत
रेनॉल्ट – ९६,३९५ पर्यंत
जगुआर लँड रोव्हर – ४.५ लाख ते ३०.४ लाख
व्हॉल्व्हो – ६.९ लाख पर्यंत
या कपातीमुळे सणासुदीच्या काळात वाहनांच्या मागणीत वाढ अपेक्षित आहे. विशेषतः लहान कार आणि हॅचबॅक सेगमेंटमध्ये १०% वाढीचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, ही कपात ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना देईल आणि प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करेल.






