Pune News | गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा ९ नोव्हेंबरला..
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. २८२ पदांसाठी ही परीक्षा असेल.राज्य कर निरीक्षक पदाच्या २७९, तर सहायक कक्ष अधिकारी पदाच्या ३ जागांसाठी ही परीक्षा असेल. उमेदवारांना १ ते २१ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत २५ ऑगस्ट आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.





