श्रीनगरमध्ये सुरक्षा जवानांवर ग्रेनेड हल्ला

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवले. श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहितील दिली.
तत्पूर्वी, श्रीनगर मार्गावरील एका टोल नाक्या जवळ ट्रक मधून प्रवास करणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांना अडवले गेल्यानंतर पोलिसांवरच गोळीबार केला होता. त्यावेळी तेथे झालेल्या चकमकीनंतर या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवानांना यश आले होते.
Jammu & Kashmir: A grenade was lobbed upon the deployed troops of Central Reserve Police Force in Srinagar today; 2 CRPF personnel and 2 civilians sustained minor splinter injuries. Injured evacuated to hospital. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/b8m9wGI6Pr
— ANI (@ANI) February 2, 2020





