मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर शुक्रवारपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याची तोंडी हमी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. गेल्या महिन्यात त्यांच्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्या. सी. व्ही बडंग यांच्या खंडपीठापुढे राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू आहे. त्यांना विशेष सरकारी वकील सुदीप पसबोला यांनी सांगितले की, या प्रकरणात राणे हेच मास्टरमाईंड ाहेत. या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी फिर्यादीने वेळ मागून घेतला आहे. मात्र राणे हे साक्षिदारांवर प्रभाव टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, राणे पोलिसांना सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळे या अर्जाची पुढील सुनावणी होईपर्यंत अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यावे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सात जानेवारीला ठेवली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात 44 वर्षीय संतोष परब यांनी फिर्याद दिली आहे. माझ्या मोटारसायकलाच्या अडवी मोटार लावून एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर वार केला. मोटारीत बसलेल्या अन्य व्यक्तीला हल्लेखोर म्हणाला, गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना या घटनेची माहिती दिली आहे. तु सतिश सावंत यांच्यासाठी काम करतो ना? तुला बघून घेतो, अशी धमकी या हल्लेखोराने दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सिंधुदूर्ग विशेष न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर राण ेयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.