दिल्लीत झोपडपट्टीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली : दिल्लीमधील गोकुळपुरी येथे शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीत 7 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही घटना गोकुळपुरी मधील 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून, आपण स्वत: घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे सांगितले.




