महाराणी एलिझाबेथ पुन्हा झाल्या पणजी; नात झारा टिंडेल यांनी दिला पुत्राला जन्म

लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची नात झारा टिंडल यांनी बुधवारी कन्येला जन्म दिला. त्यामुळे महाराणी एलिझाबेथ या अणखी एकदा पणजी बनल्या आहेत. झारा टिंडेल यांच्या पुत्राचे नामकरण ल्युकस फिलीप टिंडल असे करण्यात आले आहे. हे बालक महाराणी एलिझाबेथ यांचे 10 पतवंड आहे. ब्रिटीश राजघराण्याच्या वारसाक्रमामध्ये या बालकाचा 22 वा क्रमांक असणार आहे. महाराणी एलिझाबेथ यांनी आज आपल्या पतवंड जन्माबद्दल आनंद व्यक्त केला.
झारा टिंडल या महाराणी एलिझाबेथ यांची कन्या युवराज्ञी ऍनी आणि त्यांचे पती, इंग्लंडचे माजी रग्बी खेळाडू माईक टिंडल यांची कन्या आहेत. नुकतेच जन्म झालेले बाळ हे त्यांचे तिसरे अपत्य आहे. या दाम्पत्याला 7 वर्षांची मिया आणि 2 वर्षांची लेना या दोन कन्या आहेत. प्रसुतीसमयी हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य न झाल्याने या बाळाचा जन्म घरातील बाथरूममध्येच झाला आहे.
दोनच आठवड्यांपूर्वी झारा यांची चुलत भगिनी प्रिन्सेस युजेनी यांनीही पुत्राला जन्म दिला आहे. हे बालक महाराणी एलिझाबेथ यांचे नववे पतवंड आहे. युजेनी या एलिझाबेथ यांचे पुत्र प्रिन्स ऍन्ड्रयू यांची कन्या आहे.
महाराणी एलिझाबेथ आणि राजे फिलीप या दोघांनीही आपल्या पतवंडीच्या जन्माबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला असून लव्करच ते दोघेही रुग्णालयात जाऊन बाळ-बाळंतिणीची विचारपूस करणार आहेत, असे बकिंगहॅम राजवाड्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.





