चंदुकाका सराफ यांच्या धुळेमधील स्टोअरचा भव्य शुभारंभ; आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी!

धुळे – चंदुकाका सराफची २०० वर्षांच्या प्रवासाकडे वाटचाल सुरू असून आता ही सुवर्णपेढी आपल्या धुळेमध्ये येत आहे. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, आग्रा रोड, सराफ बाजार, धुळे येथे या नव्या स्टोअरचा शुभारंभ होत आहे.
या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. चंदुकाका सराफ स्टोअरमध्ये ३० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १ टाटा पंच कार किंवा ४ ज्युपिटर बाइक्स, रु. ३०,००० किंवा त्याहून अधिक खरेदी तसेच रु. ३,००० किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खास संधी असणार आहे. तसेच दागिन्यांच्या घडणावळीवर १००%* पर्यंत सूटही देण्यात येणार आहे.
चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे सर्व ग्राहकांनी या नव्या स्टोअरला भेट देऊन, दागिने खरेदीवर टाटा पंच कार व ज्युपिटर बाइक जिंकण्याची संधी मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





