अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पाटणमध्ये विराट मोर्चा

पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातील शाळकरी मुलीवर युवकाने लैंगिक अत्याचार करून दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी युवकावर व त्याच्या अन्य अल्पवयीन साथीदारांवर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी संबंधित संशयिताला अटक केली होती. याप्रकरणी तालुक्यातील हिंदू समाजाच्यावतीने संशयितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे, हिंदू एकताचे विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
“रेटून खोटं बोलण्याची विद्यमान आमदारांना सवय”, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
मोर्चात पाटण शहर व आसपासच्या परिसरातील नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आ. नितेश राणे म्हणाले, हिंदू महिलांवर कोणी वाकड्या नजरेने पाहिले; तर त्यांचे डोळे काढू. ही घटना ही संतापजनक असून संशयितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विक्रम पावसकर म्हणाले, हिंदू समाजाने आज विराट मोर्चाने आपली ताकद दाखवून दिली आहे. या प्रकरणातील संशयितांना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
“रेटून खोटं बोलण्याची विद्यमान आमदारांना सवय”, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
मंगळवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रामापुर येथे सकाळपासूनच युवक- युवती मोठ्या संख्येने जमू लागले होते. दुपारी 12 नंतर प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली. रामापुर ते झेंडा चौक, लायब्ररी चौक मार्गे मोर्चाचे जुन्या ग्रामपंचायत मैदानावर आक्रोश सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी संशयितांना कठोर शासन व्हावे व अशा घटना समाजात वारंवार होत आहेत, तालुक्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांना संरक्षण देण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित यंत्रणा यांच्याकडे डोळेझाक करत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांनी स्वत: आपले संरक्षण करणे काळाची गरज निर्माण झाली असून वाईट नजरेने पाहणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे, अशा प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या महिलांकडून देण्यात आल्या.
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी आ. नितेश राणे, विक्रम पावसकर, कविता कचरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





