पुणे : १४६ वर्षांची परंपरा, पारदर्शकता आणि सातत्य यातून ग्राहकांचा विश्वास संपादन करत आपला सोनेरी वारसा घेऊन, पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या चाकण येथील साडे आठ हजार स्क्वेअर फुटांच्या १५ व्या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी रांका परिवारातर्फे ११ लाखांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुरेखा वाडेकर, उद्योगपती बाळासाहेब वाडेकर, माजी महापौर योगेश बहल, बाजार समितीचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य नितीन गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, माजी सभापती दत्ता भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पीआय संजय सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे, नगरसेवक किशोर शेवकरी, उद्योजक विजय शर्मा आणि विविध गावचे सरपंच याप्रसंगी उपस्थित होते. या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवारांनी रांका परिवाराला व नवीन दालनाला शुभेच्छा दिल्या. तसेच कौशल्याने दागिने घडविणाऱ्या या कारागिरांचे मनापासून कौतुकही केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “भारतीयांच्या मनात सोने-चांदीबाबत एक विशिष्ट स्थान असल्याने, सोन्याचे भाव वाढले तरी अजूनही आपण अनेक मुहूर्तप्रसंगी, लग्नप्रसंगी किंवा घरगुती कार्यक्रमांच्यावेळी भाव वाढीचा विचार न करता सोने खरेदी करतो. त्यामुळे या व्यवसायात विश्वासार्हता जपणे महत्त्वाचे असून मागील सात पिढ्या रांका ज्वेलर्स ती जपत आहे याचा आनंद आहे.” महाराष्ट्रात सध्या जागोजागी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांकरिता रांका ज्वेलर्स यांनी ११ लाख रुपये इतका मदतनिधी फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, अनिल रांका, तेजपाल रांका, वस्तुपाल रांका, शैलेश रांका, श्रेयस रांका, मानव रांका, श्लोक रांका, ऋषभ रांका, विवान रांका यांच्या हस्ते अजित पवार यांकडे सुपूर्द केला. पुण्यात गेली अनेक वर्ष सर्वोत्तम कारागिरी, वैविध्य आणि शुद्धता जपत रांका ज्वेलर्सनी ग्राहकांच्या मनामनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. एका छोट्याशा जागेतून सुरु केलेला हा व्यवसाय आज रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, पिंपरी चिंचवड, हडपसर, कोकणे चौक(रहाटणी), सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बंड-गार्डन, बाणेर, कोंढवा, खराडी, वाघोली, ठाणे आणि आज शुभारंभ झालेल्या चाकणपर्यंत विस्तारला गेला आहे. सोने, चांदी, हिरे, मोती, जडाऊच्या दागिन्यांच्या डिझाईन्सचे भव्य कलेक्शन्स घेऊन रांका ज्वेलर्स कायमच आपलं वेगळेपण जपत आले आहेत. या क्षेत्रात कार्य करणारी सध्याची रांकांची ही सातवी पिढी आहे. नव्या पिढीच्या नव्या विचारांसह आणि कल्पकतेसह आता रांका यांनी लग्नसराईकरिता ‘विवारंभ’, आजच्या युवापिढीकरिता चांदीच्या दागिन्यांचे ‘क्रांतीनारी’, देवी-देवतांच्या पूजा साहित्याचे ‘आहि’ अशी खास कलेक्शन्स चाकणकरांसाठी या शोरुममध्येही आणली आहेत. या सोबतच खास सणासुदीनिमित्त रांका ज्वेलर्सच्या वतीने येत्या २ नोव्हेंबरपर्यंत रांका ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफरही देण्यात आली आहे. यामध्ये सोने खरेदी केल्या नंतर ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी भेट देण्यात येईल. ग्राहकांचा या ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हे विशेष. या ऑफरचा लाभ रांका ज्वेलर्सच्या रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, पिंपरी चिंचवड, हडपसर, कोकणे चौक(रहाटणी), सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, बंड-गार्डन, बाणेर, कोंढवा, खराडी, वाघोली, चाकण व ठाणे येथील दालनांमध्ये घेता येईल.