‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे लक्ष्मी रोडवर पुनरागमन, नव्या दालनाचे भव्य उद्घाटन

पुणे : महाराष्ट्रातील सर्वाधिक विश्वसनीय आणि लोकप्रिय ज्वेलरी ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स आता पुण्याच्या हृदयस्थानी – लक्ष्मी रोड येथे नव्या आणि भव्य शोअरूमसह परत आले आहेत. सरस्वती सदन, कुंटे चौक, लक्ष्मी रोड येथे ३० मार्च २०२५ रोजी या बहुप्रतीक्षित दालनाचे उद्घाटन पार पडले.
या नव्या शाखेचे उद्घाटन सोहळा रविवार, ३० मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक मा. श्री. रविंद्र वंजारवाडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी चितळे बंधू मिठाईवालेचे पार्टनर श्री. व सौ. श्रीकृष्ण चितळे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच प्रिय ग्राहकांच्या, शुभेच्छुकांच्या आणि हिरे-सोन्याच्या दागिन्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
उदघाट्न सोहळ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक मा. श्री. रविंद्र वंजारवाडकर म्हणाले, “अति उच्च दर्जाची परंपरा सांभाळणाऱ्या श्री अजित गाडगीळ यांचे लक्ष्मी रोडवर दालन सुरू झाल्यामुळे जणू सरस्वती आणि लक्ष्मीचा मिलापच झाला आहे. हे केवळ व्यवसायाचे दालन नसून, संस्कृती, परंपरा आणि नवकल्पनांचे अनोखे संगमस्थान आहे. तसेच गुणवत्तेची जपणूक आणि ग्राहकसेवेची निष्ठा हीच त्यांच्या यशाची खरी ओळख आहेच आणि तशीच कायम राहील .”
या वेळी पु. ना. गाडगीळ आणि सन्स चे संचालक श्री. अजित गाडगीळ म्हणाले, “पुणेकरांचा पु. ना. गाडगीळ आणि सन्सला लक्ष्मी रोडवर पुनरागमन करण्याचा आग्रह अनेक वर्षांपासून होता. ग्राहकांच्या या प्रबळ मागणीला आणि ब्रँडच्या दीर्घकालीन परंपरेला प्रतिसाद देत, आम्ही अत्यंत आनंदाने हे नवे भव्य दालन सुरू करत आहोत. आता पुन्हा एकदा ग्राहकांना सर्वोत्तम कलाकुसर, पारंपारिकतेची जोड आणि उत्कृष्ट सेवा यांचा मिलाफ लक्ष्मी रोड येथील दालनमध्ये अनुभवायला मिळणार आहे.” गेल्या १९० वर्षांपासून ग्राहकांना उत्कृष्ट दागिने व प्रामाणिक सेवा पुरवणाची परंपरा असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. यांचे हे नवीन पाऊल अधिक सोयीस्कर व व्यापक सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर्स:
या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांना खास आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. ही ऑफर ६ एप्रिल २०२५ पर्यंत लागू राहील.
सर्व पुणेकरांना आणि प्रिय ग्राहकांना या नव्या आणि भव्य सरस्वती सदन, कुंटे चौक, लक्ष्मी रोडवरील दालनाला भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण पु ना गाडगीळ आणि सन्स तर्फे करण्यात आले. विश्वास, परंपरा आणि दर्जेदार दागिन्यांचा शाही अनुभव आता तुमच्या आवडत्या ठिकाणी मिळेल असा विश्वास ह्या वेळी व्यक्त करण्यात आला.
ग्राहक अधिक माहितीसाठी www.pngadgilandsons.com किंवा www.onlinepng.com वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच, टोल-फ्री क्रमांक १८०० २३३ ०८८८ वर संपर्क साधू शकतात.




