Gramin News : ओतूरमध्ये तिहेरी अपघात; दोन तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

ओतूर – ओतूर ता.जुन्नर गावच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर दुचाकी व छोटा मालवाहू टेम्पो आणि कारच्या तीहेरी अपघातात दोन जण जागीच ठार व एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात ता.२५ सोमवार रोजी नगर-कल्याण महामार्गावर ओतूर गावच्या हद्दीत अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालया जवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर दुपारी सव्वा तीन वाजे दरम्यान झाला असून,
या अपघातात कुनाल नानाभाऊ काळे वय १७,रविंद्र सावळेराम भुतांबरे वय २२ दोघे ही राहणार मोरदरा,आंबेगव्हाण ता.जुन्नर जि.पुणे हे जागीच ठार झाले आहे. तर श्रीकांत खंडु काळे वय १७ हा गंभीर जखमी झाला आहे.
या अपघात सुप्रो छोटा हत्ती गाडी नं.एम एच १४ एच यु २३२१ ,दुचाकी बजाज प्लसर गाडी नं.एम एच १४ डि डि ३३५२ व हुंडाई एक्सेंट कार नं.एम एच ४३ बी जी ०८७५ ही तीन वाहने अपघात ग्रस्त झाली आहेत.
सदर अपघात बाबत अधिक माहिती अशी की आळेफाटा बाजुकडुन कल्याण बाजुकडे आकाश डुंबरे (रा.डुंबरवाडी ता.जुन्नर) हे सुप्रो छोटा हत्ती गाडी चालवत घेऊन येत होते.
त्याच वेळी मयत तरूण ओतूर बाजुकडुन आळेफाटा बाजुकडे जाणारी बजाज प्लसर दुचाकीवर चालला होता आणि त्यांच्या मागे हुंडाई एक्सेंट कार चालक अभय शेळके (रा.नेरूळ नवी मुंबई मुळ रा.कान्हुर पठार ता.पारनेर,जि.अहमदनगर ) हे कार चालवत चालले होते.
ओतूर गावाच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर अपघात ग्रस्त झाल्या असून या अपघातात दुचाकी वरील कुणाल काळे व रविंद्र भुंताबरे जागीच ठार झाले. तर श्रीकांत काळे गंभीर जखमी झाले आहे.
सदर अपघाता बाबत खबर ओतूर पोलीसांना मिळल्यावर पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.तसेच रात्री उशीरापर्यंत सदर अपघाता बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम ओतूर पोलीसात सुरू होते.





