शिरूर : रावडेवाडी (ता. शिरूर) येथील पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड़ अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि या साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- रु. प्रती टन या प्रमाणे बाजारभाव देणार असल्याची माहिती पराग साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे. पराग कारखान्याचे सन २०२४-२५ चे चालू गळीत हंगामात दि. ०२/०३/२०२५ अखेर ५८००२९ मे. टन गाळप झालेले असून ६०१३७१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असून कोजन व डिस्टिलरी प्रकल्प चालू आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील बाहेरील उस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रथम हप्ता प्रती मे. टन २८०० रुपये भाव देण्यात आला आहे. तसेच सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- प्रती मे. टन प्रमाणे भाव देणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस पराग साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे. असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.