शिरूर : शिरूर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादा नंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला होता. दि ०१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याचा सुमारास शिरूर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले (वय ४३ वर्ष) रा. पाण्याचे टाकी जवळ, शिरूर यांचे त्यांची सून अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते. या वादाच्या कारणावरून सुनेचे दोन भाऊ १) नागरेष बाजीराव काळे २) राजेश बाजीराव काळे व एक बहीण ३) निघु बाजीराव काळे सर्व रा.पाण्याची टाकी जवळ, शिरूर यांनी कोयता उलटा करून बोथट बाजू कडून कोयत्याने छातीत, पायावर मारून डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती. त्या जबर मारहाणीत वसंत भोसले हे ५ ऑगस्ट रोजी मरण पावले होते. गुन्हा घडल्यापासून आरोपी नागरेष बाजीराव काळे हा फरार होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरार आरोपी हा चाफेकर चौक चिंचवड येथे येणार असलेबाबत समजल्याने पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सदर बातमीबाबत माहीती दिल्याने सदर आरोपीस गुन्हयाच्या कामी ताब्यात घेण्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला आदेशित केले. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि हणमंतराव गिरी यांचे पथकामधील पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निलेश थोरात हे बातमी मिळालेल्या ठिकाणी चाफेकर चौक चिंचवड येथे जावुन सापळा लावून शिताफिने आरोपीस पकडून ताब्यात घेतले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोसई दिलीप पवार, पो.हवा. नाथसाहेब जगताप, परसराम सांगळे पोलीस अमंलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांचे पोलीस पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई दिलीप पवार, शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.