Gram Panchayat Results 2021 | हिवरे बाजार पोपटराव पवार यांचेच…

नगर – जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व 25 वर्षांनंतर निवडणूक होत असलेल्या नगर तालुक्यातील हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्याकडेच पुन्हा एकहाती सत्ता सोपवित संपूर्ण विश्वास दर्शविला आहे. सर्व सातही जागांवर ग्रामविकास पॅनेलचे उमदेवार विजयी झाले.
ज्या हातांनी गाव उभे केले, त्या हातांवर ग्रामस्थांनी संपूर्णपणे विश्वास दाखविला, ही आमच्यासाठी सर्वांत समाधानाची बाब आहे. निवडणूक संपली, की राजकारणही संपले पाहिजे. आता सर्वांनाच पुन्हा बरोबर व विश्वासात घेऊन हिवरे बाजारच्या पुढील 50 वर्षांच्या विकासाची पायाभरणी करू. निवडणुका व्हाव्यात. मात्र, त्या निकोप व गावाच्या विकासाच्या मुद्यांवरच व्हायला हव्यात.
पोपटराव पवार,
कार्याध्यक्ष, आदर्शगाव गाव संकल्प व प्रकल्प समिती.
महाराष्ट्र राज्य.




