पुणे | आर्म्ड फोर्स मेडिकलच्या तुकडीचा पदवीदान समारंभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या (एएफएमसी) ५८व्या तुकडीचा पदवीदान समारंभ गुरूवारी दिमाखात झाला. यावेळी झालेल्या परेडचा आढावा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी घेतला.
५८व्या तुकडीचे ११२ वैद्यकीय पदवीधर सशस्त्र दलात दाखल झाले. या पदवीधरांनी कॅप्टन देवाशिष शर्मा या एएफएमसी मधील परेड ग्राउंडवर परेड केली. लेफ्टनंट जनरल दलजितसिंग यांनी वैद्यकीय कॅडेट (आता लेफ्टनंट) सुशील कुमार सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील कमिशनिंग परेडचा आढावा घेतला.
नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, या दलाने त्यांना देश आणि सशस्त्र दलांची अत्यंत समर्पणाने सेवा करण्याचे आवाहन केले आणि त्यांना उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी दलजीत सिंग यांनी शुभेच्छा दिल्या.
एएफएमसीच्या ५८व्या तुकडीच्या कॅडेट्सनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अन्य देशातील पाच कॅडेट ससह ४७ कॅडेट पदवीधर झाले आहे. सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये नियुक्त केलेल्या एकशे बारा कॅडेट्सपैकी ८७ जेंटलमेन कॅडेट आणि २५ लेडी कॅडेट्स आहेत. ८८ जणांना लष्करात, १० नौदलात आणि १४ जणांना हवाई दलात नियुक्त करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या कॅडेटना पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंग करंडक, हे महाविद्यालयाचे दोन प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. यावर्षी राष्ट्रपती सुवर्णपदक फ्लाइंग ऑफिसर आयुष जैस्वाल यांना आणि कलिंग ट्रॉफी डॉ. ऐश्वर्या रामकृष्णन अय्यर यांना प्रदान करण्यात आली.




