अलप्पुझाः भारतातील मूलभूत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची घोषणा देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यावेळी सरकारचे हे पाऊल देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणार आहे, असे नमूद केले. केरळमधील अलाप्पुझा येथील विद्यााधिराज सैनिक शाळे्चया ४७ व्या वार्षिक कार्यक्रमात संबोधित करताना सिंह यांनी ही घोषणा केली. तसेच केंद्र सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळ केला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात प्रसिद्ध लेखिका आणि पर्यावरणवादी सुगाथाकुमारी यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या नव्या सैनिक शाळांमध्ये विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यात समाविष्ट करता यावे यासाठी केंद्र सरकारने सैनिक शाळांचा विस्तार देशातील जिल्ह्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. आरोग्य, दळणवळण, उद्योग, वाहतूक, संरक्षण अशा विविध क्षेत्रात देश प्रगतीसह स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात क्रांती होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
भारत हा विकसित देश आहे, परंतु
सैनिकाला केवळ लढाईच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, कारण प्रत्येक सैनिकात इतर अनेक गुण असतात. सैनिक शिस्तबद्ध असतो, त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, निःस्वार्थपणे सेवा करतो, आत्मसंयमी असतो. भारत हा वेगाने विकसित होणारा देश आहे. परंतु, त्याचा विकास सर्वसमावेशक, न्याय्य, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि नैतिकदृष्ट्या वांछनीय असला पाहिजे. देशाचा उपभोग हा लोभावर आधारित नसून गरजेवर आधारित असला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
तरुणांनी जीवनात पुढे जावे
स्वावलंबनाच्या मार्गावर भारताच्या वेगवान प्रगतीचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या सहकार्याने आरोग्य, दळणवळण, उद्योग, वाहतूक आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात नवीन उंची गाठली जात आहे. देशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करताना तरुणांनी त्यांच्या आकांक्षेनुसार जीवनात पुढे जावे यासाठी सरकारच्या प्रयत्नांचाही संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.