Dance Video Viral : ‘अंखियों से गोली मारे’ गाण्यावर गोविंदाच्या लेकाचा अन् रविनाच्या मुलीचा भन्नाट डान्स; नेटकरी म्हणतात…

सिनेमा इंडस्ट्रीमधील अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री रविना टंडन यांची लहाणपणापासूनची निखळ मैत्री आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचही मैत्री आहे. गोंविदाचा मुलगा यशवर्धन आणि रविनाची लेक राशा थडानी यांचा एक व्हडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हडिओमध्ये हे दोघेही डान्स करताना दिसत आहेत. राशा थडानीनं यशवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. राशानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट शेअर करत यशवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या डान्स व्हिडिओच्या क्लिपमध्ये यशवर्धन हुडी परिधान केली आहे, तर राशानं शर्ट परिधान केला आहे. या व्हिडिओत दोघेही रविना आणि गोविंदाच्या २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंखियों से गोली मारे चित्रपटातील गाण्यावर डान्य करताना दिसत आहेत. दोघांनीही या डान्समधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
त्यांच्या या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत स्तुती करत आहेत. अनेकांनी म्हटलं की या गाण्यावर या दोघांनी डान्स करून या गाण्याला जस्टिफाय केले आहे. रविनाची लेक राशाबद्दल बोलायचे झाल्यास ति अजय देवगणच्या आझाद चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आता राशा आणि यशवर्धनला एकत्र पाहण्याची इच्छा नेटकरी व्यक्त करत आहेत.





