गोविंदा व पत्नी सुनीता 37 वर्षानंतर घेणार घटस्फोट? कारण आले समोर

Govinda And Sunita Ahuja | अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघेही लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे.
याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे होणाऱ्या सततच्या मतभेदांमुळे हा निर्णय ते घेत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, गोविंदा किंवा सुनीता आहुजा या दोघांनीही याबाबत अधिकृत विधान केलेले नाही. Govinda And Sunita Ahuja |
एका मुलाखतीदरम्यान वेळापत्रक जुळत नसल्याने ते दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात असल्याचे सुनीताने सांगितले होते. दरम्यान, सुनीता १५ वर्षांची होती तेव्हा गोविंदाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तीन वर्षांनी तिने गोविंदाशी लग्न केलं. लग्नात सुनीता १८ वर्षांची तर गोविंदा २४ वर्षांचा होता.
सुरुवातीला लग्न झाल्याची बातमी गोविंदाने करिअरच्या फायद्यासाठी लपवली होती. गोविंदा व सुनीता यांना १९८८ मध्ये मुलगी झाली, तिचं नाव टीना आहे. त्यानंतर ९ वर्षांनी त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव यशवर्धन आहे. Govinda And Sunita Ahuja |
हेही वाचा:





