कोंढवा दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांनी व्यक्त केले दुःख
Updated On:

मुंबई : कोंढवा पुणे येथे शनिवारी (दि. 29) गृहनिर्माण संकुलाची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पुणे येथील गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निरपराध कामगार, महिला व मुलांना जीव गमवावा लागला हे समजून अतिशय दुःख झाले. गमावलेला प्रत्येक जीव मोलाचा होता. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे.





