Rahul Gandhi On Narendra Modi: ‘गरीबांचे साडे आठ हजार कोटी रूपये सरकारने लुटले’; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्ला

Rahul Gandhi On Narendra Modi – सार्वजनिक क्षेत्रातील बँका खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून कोट्यवधींचा दंड वसूल करत असल्याचा आरेाप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘ही दंडाची व्यवस्था म्हणजेच पंतप्रधानांचे चक्रव्युहाचेच एक द्वार आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोपही त्यांनी केला.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०१९-२० पासून गेल्या पाच वर्षांत या कारणावरून सुमारे ८५०० कोटी रुपये वसुल केल्याची माहिती सरकारनेच एका लेखी उत्तरात दिल्याने त्यावरून राहुल गांधी यांनी हा हल्ला चढवला आहे. वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती ही माहिती दिली.
त्यावर प्रत्रिकीया देताना हिंदीतील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘की नरेंद्र मोदींच्या अमृतकाळात सर्वसामान्य भारतीयांचे रिकामे खिसेही लुटले जात आहेत. ज्या सरकारने उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले होते, त्या सरकारने गोरगरिबांकडून ८५०० कोटी रुपये वसूल केले आहेत.
बँकेत किमान शिल्लक ठेवण्यासाठीही ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याकडूनच सरकार ही लुट करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु लक्षात ठेवा भारतातील लोक हे अभिमन्यू नाहीत तर अर्जुन आहेत, त्यांना चक्रव्यूह मोडून तुमच्या अत्याचाराला कसे उत्तर द्यायचे हे माहित आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.





