भारत सरकारने लसीकरण अॅपचे विकेंद्रीकरण करावे – जयंत पाटील

मुंबई – लसीकरणाची प्रक्रिया सर्वांसाठी सोपी आणि सर्वसमावेशक असावी. कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अॅपचे विकेंद्रीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
कोविन अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी जाणवत आहेत. लॉगिन व ‘ ओटीपी’साठी विलंब होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अॅपवरून जवळपास 1.3 अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. महत्त्वपूर्ण अशा या लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
The sheer number of complaints of CoWin platform – technical lags, login issues and OTP delays – reflects serious logistical concerns. It is indeed a challenge to timely register 1.3 billion Indians on one central platform. (1/3) https://t.co/ToF19mVMC2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 10, 2021
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक राज्याला स्वतंत्र अॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र सरकारने यावर तात्काळ विचार करावा, असे जयंत पाटील म्हटले आहे.




