Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू

Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग (Fire) लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांची सुखरुप सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे (Fire) स्वरुप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
गोरेगाव पश्चिममधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजता आग ही लागली. ही इमारत पाच मजली आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये ‘लेव्हल २’ स्वरुपाची आग (Fire) लागली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मृतांमध्ये १ पुरुष, तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
आगीमध्ये (Fire) जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत तळमजल्यावरील काही दुकाने आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागल्याने झोपेत आग (Fire) लागल्याचे उशिरा लक्षात आल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उशीर झाला.





