प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – काटेवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धअभिषेक घालण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना जाणीवपूर्वक पंचायत जत समितीतील एका इंजिनिअरने आत्महत्या केली. त्यामध्ये थेट आमदार पडळकर यांना अकसापोटी त्यांची बदनामी केली. त्यानंतर जत येथे त्या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी पडळकरांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. कारण त्यामागची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. काही वर्षांपासून गोपीचंद पडळकरांवर अनेक वेळा हल्ले करण्यात आले, अनेक चुकीचे आरोप लावण्यात आले. पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका करताच शरद पवारांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना फोन केला. आमचे शरद पवारांना म्हणणे आहे, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अनुद्गार काढले जाते, धनगर समाजाबद्दल मनोज जरांगे खालच्या पातळीवर बोलतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांना का फोन केला नाही, कारण जयंत पाटील हे पक्षाचे आहेत म्हणून का शरद पवार दुटप्पी वागत आहेत. यावेळी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, ज्ञानदेव खामगळ, मनोज पिंगळे, सुहास टकले, आदी मान्यवर उपस्थित होते.