गुजरातमधून केजरीवालांसाठी आनंदाची बातमी ; आपचे उमेदवार गोपाळ इटालियांनी भाजपचा केला पराभव

Gopal Italia in Gujarat। गुजरातमधील विसावदर आणि काडी या दोन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार गोपाल इटालिया यांनी विसावदर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार किरीट पटेल यांचा दारुण पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गोपाल इटालिया यांना ७५९४२ मते मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांना ५८३८८ मते मिळाली. अशाप्रकारे गोपाळ इटालिया यांनी किरीट पटेल यांचा १७५५४ मतांनी पराभव केला.
काँग्रेस उमेदवाराला किती मते मिळाली? Gopal Italia in Gujarat।
याशिवाय काँग्रेसने या जागेवर नितीन रणपरिया यांना तिकीट दिले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नितीन रणपारिया यांना फक्त ५५०१ मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
१९ जून रोजी पोटनिवडणूक पार पडली Gopal Italia in Gujarat।
विसावदर जागेवर १९ जून रोजी पोटनिवडणूक झाली होती. १९ जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघात ५६.८९ टक्के मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भूपेंद्र भयानी यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त
विसावदरची जागा डिसेंबर २०२३ मध्ये तत्कालीन आप आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिक्त झाली होती.
गुजरातमध्ये भाजपचे १६१ आमदार
१८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे १६१ आमदार आहेत, तर काँग्रेसचे १२ आणि आपचे चार आमदार आहेत. समाजवादी पक्षाकडे एक जागा आहे आणि दोन जागांवर अपक्ष आमदार आहेत.
हेही वाचा
“विमान उडवता येत नसेल तर चप्पल शिवायला जा” ; प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे वरिष्ठांविरुद्ध गंभीर आरोप





