पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! करोना मुक्तीचे प्रमाण 95 टक्क्यांवर

पुणे विभागात 15 दिवसांत 5 टक्क्यांनी मुक्तीचे प्रमाण वाढले
पुणे – मागील पंधरा दिवसात पुणे विभागातील करोनामुक्तीच्या प्रमाणात 5 टक्कयांनी वाढ झाली आहे. आजपर्यंत विभागातील 16 लाख 13 हजार 457 करोना बाधितांपैकी 15 लाख 27 हजार 525 बाधित करोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच विभागातील करोनामुक्त दर हा 95 टक्कयांपर्यंत पोहचला आहे.
दरम्यान मृत्युदर 2.2 टक्के असून, पुणे शहरासह जिल्ह्यातील बाधित संख्या कमी झाली असून, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे या विभागात बाधित दर दहा टक्कयांच्या पुढे आहे.
विभागात 53 हजार 363 बाधितांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 32 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 लाख 26 हजार 780 बाधितांपैकी 9 लाख 94 हजार 528 रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तीचे प्रमाण 96.86 टक्के इतका आहे.




