Pune-Nagpur Special Trains : नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे-नागपूर, हडपसर-नागपूर आणि हडपसर-राणी कमलापती स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १. हडपसर–नागपूर विशेष गाडी (०८ फेऱ्या) गाडी क्र. ०१२२२: २८, ३० डिसेंबर आणि १, ४ जानेवारी रोजी हडपसर येथून दुपारी ०३:५० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्र. ०१२२१: २६, २९, ३१ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी नागपूर येथून रात्री ०७:४० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता हडपसरला पोहोचेल. प्रमुख थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि अजनी. डब्यांची संरचना: २ प्रथम वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे. २. पुणे–नागपूर विशेष गाडी (०८ फेऱ्या) गाडी क्र. ०१४१९: २७, २९, ३१ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी पुणे येथून रात्री ०८:३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ०२:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्र. ०१४२०: २८, ३० डिसेंबर आणि १, ४ जानेवारी रोजी नागपूर येथून दुपारी ०४:१० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्यात पोहोचेल. प्रमुख थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. डब्यांची संरचना: १६ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे. ३. हडपसर–राणी कमलापती विशेष गाडी (०६ फेऱ्या) गाडी क्र. ०२१५५: २८ डिसेंबर ते ११ जानेवारी दरम्यान दर रविवारी हडपसर येथून सकाळी ०७:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:४० वाजता राणी कमलापती स्थानकावर पोहोचेल. गाडी क्र. ०२१५६: २७ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान दर शनिवारी राणी कमलापती येथून सकाळी ०८:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ००:१० वाजता हडपसरला पोहोचेल. प्रमुख थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, भुसावळ, इटारसी आणि नर्मदापूरम. डब्यांची संरचना: ३ तृतीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, २ शयनयान (Sleeper) आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे. दरम्यान, विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘एनटीईएस’ (NTES) ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने केले आहे.