Parineeti Chopra : परिणीती चोप्राकडे गुडन्यूज? कपिलच्या प्रश्नावर राघवने दिली हिंट, Video व्हायरल

Parineeti Chopra : टेलिव्हिजनवर सध्या प्रसिद्ध कॅामेडी कलाकार कपिल शर्मा यांचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बोलबाला आहे. या शोमध्ये अनेक जोडींनी हजेही लावली आहे. या शोमधून आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर आलेले गेस्ट मनमोकळ्या संवाद साधतात. शोचे होस्ट कपिल हे त्यांची फिरकीही घेत असतात. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा या जोडीने हजेरी लावली होती.
दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक मजेशीर किस्से शेअर केले. या शोमध्ये कपिलने एक प्रश्न केला आणि यावर सर्वांच्या भुवय्या उंचावल्या . कपिल म्हणाला तुम्ही बेबी प्लॅनिंग करणार आहात का? या प्रश्नावर राघवच्या उत्तराने सर्वजण पाहतच राहिले. देईल… तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ, असं पटकन उत्तर त्याने दिलं. त्याच्या उत्तराने परिणीती शॅाक झाली. अन् नंतर तिलाही हसू आलं.
नेमकं काय घडलं?
कपिलने खरंतर हा प्रश्न दोघांना विचारला होता. या प्रश्नावर राघवने हसत उत्तर देत देईल तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ असं म्हटलं. या उत्तराने परिणीती काही वेळी थोडीशी शाॅक झाली होती. राघवकडे काही वेळी गोंधळलेल्या नजरेने ती पाहत होती. पण नंतर तिलाही आपलं हसू आवरता आलं नाही.
View this post on Instagram
यामुळे आता सोशल मीडियावर परिणीती आणि राघव लवकरच गोड बातमी देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.





