‘सोने’ खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! वाढत्या किमतीला लागला ‘ब्रेक’ 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या

Gold Price Today । गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाला. मात्र आज वाढत्या दराला ब्रेक लागलेला पाहायला मिळाला आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईसह राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६२,३२४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६७,९९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ६७,९९० रुपये आहे.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६८,११० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८१,६२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,०२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.





