गोंदियामध्ये बसचा भीषण अपघात ; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू , मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत जाहीर

Gondia Bus Accident । गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढले Gondia Bus Accident ।
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटी झाली. या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर Gondia Bus Accident ।
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.





